मुंबई : चिनी सैनिकांसोबत गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 सैनिक शहीद झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनकडून घुसखोरी झाली नसल्याचं स्पष्ट केलं. पंतप्रधानांच्या या निवेदनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शहीद झालेल्या जवानांबद्दल पंतप्रधानांना सवाल केला आहे.
जर कुणी सीमेत घुसलं नाही. कुठल्या पोस्टवर ताबा घेतला नाही, मग 20 सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची? असं ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला आहे.
जर कुणी सीमेत घुसलं नाही , कुठल्या पोस्ट वर ताबा घेतला नाही मग 20 सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची??
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 20, 2020
महत्वाच्या घडामोडी-
राजू शेट्टींच्या विधानपरिषदेचा मार्ग मोकळा; स्वाभिमानीतील वाद मिटला
भारत मजबूत आहे, मजबूर नाही- उद्धव ठाकरे
सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांना शरद पवार आणि सोनियांनी दिल्या ‘या’ सूचना
आम्ही उद्धव ठाकरेंकडे उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत