…तेंव्हा उद्धव ठाकरेंकडून ‘ती’ चूक झाली; एकनाथ खडसेंनी सांगितलं सविस्तर कारण

0
759

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

भुसावळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेविरोधात बंड केलं. त्यानंतर शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. तसेच या बंडानंतर दोन्ही पक्षाकडून धनुष्यबाण कोणाकडे जाणार, यात रस्सीखेच सूरू आहे. यावर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनुष्यबाण चिन्ह हे शिवसेनेलाच मिळाले पाहिजे, असं मत एकनाथ खडसेंनी यावेळी व्यक्त केलं. ते माध्यमांशी बोलत होते. तसेच खडसेंनी यावेळी बोलताना, शिवसेनेकडून झालेल्या चुकीवरही भाष्य केलं.

हे ही वाचा :एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यासह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण, त्यांनी विश्वास मताला सामोरे जाऊन अधिवेशनात संख्याबळाची चाचणी केली असती तर अधिक उचित ठरले असते, असं खडसे म्हणाले.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठात उद्धव ठाकरेंनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देण्यात आला, मात्र आमदारांच्या अपात्रतेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. चिन्हाबाबत निवडणूक आयोगाची भूमिका काय हे आयोगाच्या निर्णयानंतर स्पष्ट होईल. शिवसेना हा जुना पक्ष असून धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेला मिळावा ही अपेक्षा आहे. 16 आमदार अपात्र झाले तर हे सरकार कोसळू शकतं., असा दावाही खडसेंनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“उद्धव ठाकरेंची मोठी खेळी; काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी नगरसेवकांनी हाती बांधलं शिवबंधन”

…तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही मला संपवू शकत नाही; पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण

उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का ; ‘या’ बड्या नेत्याच्या मुलाने केला शिवसेनेत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here