Home महाराष्ट्र …तर नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करा; किरीट सोमय्यांचं थेट ठाकरे सरकारला आवाहन

…तर नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करा; किरीट सोमय्यांचं थेट ठाकरे सरकारला आवाहन

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरी : महाविकास आघाडीवर सातत्याने आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला.

हे ही वाचा : “आगामी निवडणुकीच्याआधी काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ दोन नेत्यांनी केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश”

नारायण राणे यांनी सीआरझेडचं उल्लंघन करून बंगला बांधला असेल तर त्यावर कारवाई करा, असं आव्हान किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

अनिल परब यांच्या बंगल्याबाबत बोलता नारायण राणेंच्या बंगल्याबाबत का बोलत नाही? असा सवाल मला केला जातो. राज्यात सरकार कुणाचं आहे? कोस्टल झोन अॅथोरीटी पर्यावरण खात्याकडे आहे. त्याचे मंत्री आदित्य ठाकरे आहेत. त्यामुळे मग राणेंनी काही चुकीचं केलं असेल तर करा कारवाई. पुरावे असतील तर पुढे जा, असं सांगतानाच तुम्ही कारवाई करत नाहीत. याचा अर्थ उद्धव ठाकरे आणि राणेंमध्ये सेटिंग झाली आहे का? असा सवाल सोमय्या यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

मंत्रालय बंद, ‘दुकानदारी’ सुरू; पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारवर टीका

‘नाचता येईना, अंगण वाकडं’, अशी सरकारची अवस्था; प्रीतम मुंडेंचा घणाघात

“पुण्यात मनसेला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता पक्ष सोडण्याची चर्चा”