Home महाराष्ट्र मंत्रालय बंद, ‘दुकानदारी’ सुरू; पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारवर टीका

मंत्रालय बंद, ‘दुकानदारी’ सुरू; पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारवर टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : या सरकारमध्ये भ्रष्टाचार जोरात सुरू आहे. मंत्रालय बंद आहेत, पण ‘दुकानदारी’ जोरात सुरू आहे, अशी टीका भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

“आम्ही वीज बिल वसुली बंद करा म्हटले, तर वीज बंद केली. वैधानिक विकास महामंडळे बंद केली. आमच्या सरकारने सुरू केलेल्या योजना बंद केल्या. या सरकारमध्ये सर्व योजना बंद होत आहेत, पण भ्रष्टाचार जोरात सुरू आहे. मंत्रालयं बंद राहात आहेत, पण ‘दुकानदारी’ जोरात सुरू आहे, असं पंकजा मुंडेनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : ‘नाचता येईना, अंगण वाकडं’, अशी सरकारची अवस्था; प्रीतम मुंडेंचा घणाघात

मुख्यमंत्रिपद, त्याखालोखाल गृहमंत्रिपद महत्त्वाचे आहे. पण मंत्री स्वत:च भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले असतील, तर जनतेने कुणाकडे बघायचे? कुणाकडून अपेक्षा ठेवायची?, असा सवाल करत या सरकारकडून लोकांना आता अपेक्षा राहिल्या नाहीत. निवडणुकीत लोक सरकारला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात.

दरम्यान, “एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. एखाद्या संघटनेच्या सगळ्या मागण्या मान्य करता येत नाहीत. पण त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. सरकारने चर्चेसाठी विलंब केल्यामुळे हा संप चिघळला, असंही  पंकजा मुंडेनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“पुण्यात मनसेला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता पक्ष सोडण्याची चर्चा”

“महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या उपाध्यक्षपदी धनंजय पाटील यांची निवड”

“सांगली जिल्हा बँक निवडणूक निकाल; शिवसेनेचे अजितराव घोरपडे मोठ्या मताधिक्याने विजयी”