“..तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या”

0
531

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड :  देगलूरमधून भाजपनं शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना मैदानात उतरवलं आहे. साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या भाजप मेळाव्यात चंद्रकातं पाटील यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.

आम्ही पंढरपूर जिंकून दाखवलं. तुम्हा तिघांच्या विरोधात ग्रामपंचायती जिंकल्या, साखर कारखाने जिंकले. कराडच्या कृष्णा कारखान्यात 21 पैकी 21 जागा आम्ही जिंकल्या. तुम्ही कितीही एकत्र आले तरी आम्ही देगलूरची जागा जिंकणारच, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, आम्ही हे राज्य विजयी केलं नव्हतं. मात्र, विधानसभेला सर्वाधित मतदान आम्हाला आहे. आम्हाला 20 आमदार कमी पडले आणि आम्हाला सर्व ठिकाणी धोका झाला. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आम्ही बांधावर होतो, तेव्हा पंकजा मुंडे अमेरिकेत होत्या; धनंजय मुंडेंचा टोला

जर पोलिसांना प्रियांका गांधी यांना सोडलं नाही तर…; नाना पटोलेंचा इशारा

पूरग्रस्त भागाची पाहणी केली म्हणजे सर्व कळते असे नाही; अजित पवारांचं प्रत्युत्तर

कोणीही गेलं तरी, शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक आपल्यासोबत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here