आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. 1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेत राज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. यावरुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य उभारलं. जर छत्रपती शिवाजी महाराज मुघलांशी लढले नसते तर आज कदाचित राज ठाकरे सुद्धा मुसलमान झाले असते, असं विधान रामदास आठवले यांनी केलं.
हे ही वाचा : “मनसे आणि भाजपा महाराष्ट्र बदनाम करत आहेत”
दरम्यान, रामदास आठवले यांच्या मूळ गावी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालेवाडी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बुद्ध, तसेच सर्व महापुरूषांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन…”; अब्दुल सत्तार यांचं मोठं वक्तव्य
आम्हीच आता शिवसेनेचा कोथळा बाहेर काढू; रावसाहेब दानवेंचा जोरदार हल्लाबोल