Home महाराष्ट्र “…मग पंतप्रधानांचा 5 ऑगस्टचा कार्यक्रमही प्रतिकात्मक करा”

“…मग पंतप्रधानांचा 5 ऑगस्टचा कार्यक्रमही प्रतिकात्मक करा”

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदसाठी सरकारने केलेल्या नियमावलीवरुन एमआयएम खासदार इम्तियाज जलील हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. ही नियमावली मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आम्हाला प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करा, असा सल्ला दिला जातो. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला ज्या कार्यक्रमाला जाणार आहेत, तो कार्यक्रम दिल्लीत बसून प्रतिकात्मक का केला जात नाही, असा प्रश्नही इम्तियाज जलील यांनी विचारला आहे.

बकरी ईदसाठी मशीद उघडण्याला तसंच प्राण्यांची कुर्बानी द्यायला परवानगी द्यावी, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली होती. मात्र कोरोना परिस्थिती पाहता महापालिका हद्दीत सूट मिळणार नाही, असे आदेश औरंगाबाद महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

दरम्याम, नक्की कोण अधिकारी आणि काय विचार करून, असे नियम बनवतात? असा सवालही इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींची मराठीतून शपथ; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याकडून कौतुक

राणे पिता पुत्रांवर शिवसेने केली सडकून टीका; दिली लाल तोंडाच्या माकडांची उपमा

मी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प नाही; माझ्या डोळ्यांसमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकत नाही- उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस यांना अमृता फडणवीसांकडून खास शुभेच्छा; म्हणाल्या…