…तर तुम्हांला जीवे मारून टाकू; खासदार नवनीत राणा यांना सातत्याने धमक्या; दिल्लीत तक्रार दाखल

0
305

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : खासदार नवनीत राणा यांना एका मोबाईल क्रमांकावरून त्यांच्या वैयक्तिक दूरध्वनीवर सातत्याने शिवीगाळ, जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांच्या स्वीय सहायकांनी दिल्लीतील नाॅर्थ अव्हेन्यू पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

नवनीत राणा यांच्या वैयक्तिक क्रमांकावर सोमवारी सायंकाळपासून सातत्याने संपर्क साधण्यात येत आहे. आतापर्यंत 11 वेळा कॉल करण्यात आले आहेत. एक अज्ञात व्यक्ती नवनीत राणा यांना असभ्य भाषेचा वापर करून धमक्या देत आहे.

हे ही वाचा : “शिवसेनेत जोरदार इनकमिंग; पंजाबमधील असंख्य तरूणांनी शिवबंधन हाती बांधत केला युवासेनेत प्रवेश”

तुम्हाला महाराष्ट्रात पाय ठेवू दिला जाणार नाही. हनुमान चालीसाचे पठण केले तर जीवे मारून टाकू, अशा धमक्या दिल्या नवनीत राणा यांना दिल्या जात आहेत. त्यामुळे नवनीत राणा या मानसिक तणावाखाली असून या अज्ञात व्यक्तीची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

छत्रपतींना जेंव्हा सन्मान देण्याची वेळ येते, तेंव्हा शिवसेनेनं…; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

ज्ञानवापी मशीद प्रकरणी शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले, मंदिर जेवढं जुनं त्याचप्रमाणे….

मनसेनं शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर केल्यानंतर, आता राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here