आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मशिदीवरील भोंग्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गेल्या काही महिन्यांपूर्वी जोरधार विरोध केला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. आता मनसेकडून पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
अशातच 24 ऑक्टोंबर रोजी दिवाळी असल्यानं सर्वत्र जोरदार दिवाळी साजरी करण्यात आली. रात्रभर फटाके उडत असल्याने एका व्यक्तीने ट्विटरवर मुंबई पोलिसांना टॅग करत रात्रीच्या वेळी फटाके वाजत असल्याची तक्रार केली होती. यावरून आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्रतिक्रिया देत फटाक्यांना विरोध करणाऱ्यांना देश सोडून जाण्याचे म्हटले होते. त्यावरून शिवसैनिकांनी त्यावर प्रत्युत्तर देताना टीका केली होती. यावरून आता अमेय खोपकरांनी शिवसैनिकांना इशारा दिला आहे.
हे ही वाचा : बच्चू कडूंसह धनुष्यबाणावर निवडून आलेले 8 आमदार आमच्या संपर्कात; ‘या’ नेत्याचा गाैफ्यस्फोट
मला शिव्या घालणारे लोकं शिवसेनेचे आहेत. जर माझ्या विधानावर खालच्या पातळीवत टीका केली तर मी घरात घुसून मारेन, मी हा दम शिवसैनिकांना देत आहे. हिंदूंचा सण हा जोरात साजरा होणार, असं म्हणत खोपकर यांनी आपल्या ट्विटशी सहमत राहून शिवसैनिकांना इशारा दिला आहे.
दरम्यान, किशोरी पेडणेकर यांना फटाक्यांचा त्रास होतो का? भोंग्यांचा त्रास त्यांना झाला नाही का? या बेअक्कल लोकांनी शिवाजी पार्कवर जावं आणि जो सण साजरा करत आहोत तो पाहावा. हिंदूंची संस्कृती सगळ्यांना कळली पाहीजे, अशी जोरदार टीका खोपकरांनी यावेळी केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
…तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य
…तर यावर एकच उपाय, तो म्हणजे डॉ. शिंदे साहेब; मंत्री शंभूराज देसाईंचा आदित्य ठाकरेंना टोला
दादांसारखा नेता मुख्यमंत्रीपदी असावा; आमदार रोहित पवारांचं मोठं विधान