“ठाकरे सरकार अशा द्वेषपूर्ण उटपटांग निर्णयासाठी कायम लक्षात राहील”

0
271

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी दिली नसल्याचं समोर आलं आहे. यावरून भाजप नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं आहे. अशातच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपालांना विमान नाकारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कोत्या मनाचे दर्शन घडवले आहे. शिवनेरी पायी चढून जाणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खमके आहेत, ते या कोतेपणाला पुरून उरतील, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकार अशा द्वेषपूर्ण उटपटांग निर्णयासाठी कायम लक्षात राहील, असंही अतुल भातखळकर म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी 

उदयनराजे भोसलेंनी सांगितलं शरद पवारांना भेटण्यामागचं कारण; म्हणाले…

“शिवजयंतीसाठी ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर”

आता महाराष्ट्रातील जनता या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल- आशिष शेलार

BREAKING NEWS! उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here