मुंबई : मुंबईमध्ये 7 ठिकाणी मलजल पम्पिंग केंद्र उभारून मलजलावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यास मदत होणार आहे. मात्र पालिकेतील अकार्यक्षम सत्ताधारी शिवसेनेमुळेच हा प्रकल्प रखडल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला होता. आता यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
जो मलजल प्रक्रिया प्रकल्प २०१७ ला पूर्ण होणे अपेक्षित होते त्याचे काम शिवसेनेच्या आर्थिक हितसंबंधांमुळे अजूनही सुरू झालेले नाही. हरित लवादाने महापालिकेला कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे घणाघाती आरोप काँग्रेस नेते भाई जगताप यांचे आहेत… दुभत्या म्हशी च्या लाथा गोड., असं ट्विट करत भातखळकरांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
जो मलजल प्रक्रिया प्रकल्प २०१७ ला पूर्ण होणे अपेक्षित होते त्याचे काम शिवसेनेच्या आर्थिक हितसंबंधांमुळे अजूनही सुरू झालेले नाही. हरित लवादाने महापालिकेला कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे घणाघाती आरोप काँग्रेस नेते भाई जगताप यांचे आहेत… दुभत्या म्हशी च्या लाथा गोड. pic.twitter.com/ovsLoPx739
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 13, 2021
महत्वाच्या घडामोडी –
…मग डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका- संजय राऊत
पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आणखी एक चित्रपट; ‘हा’ अभिनेता साकारणार मोदींची भूमिका
“औरंगाबादमध्ये कडकडीत लाॅकडाऊन; पहा काय सुरू, काय बंद”
“विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा; तेल स्वस्त झालंय का?”