मुंबई : बेळगावमध्ये मराठी माणसांवर सुरू असलेल्या दडपशाहीविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बेळगावात परिस्थिती चिघळत असेल तर त्याला केंद्र सरकार जबाबदार असेल. तसेच केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करावा, असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कर्नाटकातील दडपशाहीविरोधात आम्ही आवाज उठवू. मात्र त्यांनी कठोर पावलं उचलायला भाग पाडलं तर ती पावलं सरकारी नसतील. ती राजकीय पावलं असतील. मग डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका, असा इशारा संजय राऊतांनी यावेळी कन्नडगियांना दिला.
दरम्यान, बेळगावात मराठी माणसांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल जर कोणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला पूर्ण ताकदीनिशी बेळगावात उतरावं लागेल. मी काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवेदनं पाहिली आहेत. बेळगावला महाराष्ट्रात आणायचं ही त्यांची भूमिका आहे. पण सर्वांत आधी तिकडच्या मराठी लोकांना संरक्षण देण्याची गरज आहे, असं संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आणखी एक चित्रपट; ‘हा’ अभिनेता साकारणार मोदींची भूमिका
“औरंगाबादमध्ये कडकडीत लाॅकडाऊन; पहा काय सुरू, काय बंद”
“विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा; तेल स्वस्त झालंय का?”
मी तर म्हणतो की हे सरकार एकही दिवस राहू नये- नारायण राणे