Home महाराष्ट्र पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आणखी एक चित्रपट; ‘हा’ अभिनेता साकारणार मोदींची भूमिका

पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आणखी एक चित्रपट; ‘हा’ अभिनेता साकारणार मोदींची भूमिका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आता आणखी एक नवीन चित्रपट येणार आहे.

‘इंडिया इन माय वेन्स’ या नवीन चित्रपटाच्या नावाची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष मलिक हा चित्रपट साकारणार आहेत.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभाग 2014 मध्ये स्वीकारला. तेव्हा पासून त्यांनी केलेली विकास कामे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. 29 मार्च पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. यामध्ये कॅप्टन राज माथूर मोदींची भूमिका साकारणार आहे. तर सुरेंद्र पाल, रझा मुराद, अभिनेता बिंदू दारा सिंग, शाहबाद खान हे महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.

दरम्यान, 2019 च्या निवडणूकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट आला होता. बाॅलिवूड अभिनेता विवेक ओबेराॅय याने नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली होती. पण हा चित्रपट जास्त चालला नाही. त्यामुळे हा चित्रपट कितपत चालेल हे पाहणं उत्सुकतेंच असणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“औरंगाबादमध्ये कडकडीत लाॅकडाऊन; पहा काय सुरू, काय बंद”

“विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा; तेल स्वस्त झालंय का?”

मी तर म्हणतो की हे सरकार एकही दिवस राहू नये- नारायण राणे

“भारत विरूद्ध इंग्लंड टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय”