Home महाराष्ट्र पीडितेला न्याय देण्याच्या अनुषंगानं राज्य सरकार प्रयत्नशील राहील- अजित पवार

पीडितेला न्याय देण्याच्या अनुषंगानं राज्य सरकार प्रयत्नशील राहील- अजित पवार

मुंबई : हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून मारण्याची धक्कादायक घटना घडली होती. अखेर त्या तरुणीची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली. आज सकाळी 6.55 वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महिलांवरील अत्याचार, विनयभंग आणि हत्या यांसारख्या प्रकरणांवरील कायदेशीर कारवाई प्रक्रिया अल्पावधीतच कशी पूर्ण होईल आणि पीडितेला न्याय देता येईल, या अनुषंगानं राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

या दृष्टिकोनातून जलद निर्णय प्रक्रियेसाठी देश पातळीवरही गांभीर्यानं विचार झाला पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“ती आपल्यातून निघून गेली, पण तिच्या मारेकर्‍याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी”

त्या हरामखोराला जागेवरच ठार मारा; हिंगणघाट प्रकरणावर निलेश राणेंची संतप्त प्रतिक्रिया

जो त्रास माझ्या मुलीला झाला तो त्रास आरोपीला झाला पाहिजे- पिडीतेच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

काँग्रेसचा ‘हा’ नेता म्हणतो; राज ठाकरेंनी मनसेचं इंजिन भाजपला भाड्याने दिलं आहे