लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनचं राज्य सरकारकडे कसलंच नियोजन आणि धोरण नाही- राजू पाटील

0
264

मुंबई : लॉकडाऊनमध्ये राज्यात काही शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत बेस्ट बस सुरु झाल्या आहेत. मुंबईत आज ठिकठिकाणी गर्दी पाहायला मिळाली. यावरुन मनसे आमदार राजू पाटील  यांनी राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनवर टीका केली आहे.

लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलं आहे. कसलंच नियोजन आणि धोरण दिसत नाही, असं म्हणत राजू पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

“तुमचा #lockdown exit plan काय ?” असा सवाल  राज ठाकरेंनी राज्य सरकारला विचारला होता. सरकारकडे या प्रश्नाचं तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही. लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलं आहे. कसलेच नियोजन व धोरण दिसत नाही, असं ट्विट राजू  पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, राजू पाटील यांनी मरिन ड्राईव्ह, रस्त्यावरील ट्राफिक आणि अनेक लोकांच्या रांगा लागलेले फोटो ट्विट केले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“शरद पवार उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर”

“…तर मी स्वत: सामना प्रेसवर येऊन तुमच्या पाया पडायला तयार आहे”

मनसेची आजची राज्यातील परिस्थिती बिकट- अशोक चव्हाण

तुम्ही सरकार म्हणून कमी पडलात म्हणून…; राम कदमांचं संजय राऊतांवर टीकास्त्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here