मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला अवघ्या काही तासात सुरवात होत आहे. यावरुन शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदींवर आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
पंतप्रधान मोदी आज राम मंदिरासाठी पहिली कुदळ मारतील. त्या मातीत कारसेवकांच्या त्यागाचा गंध आहे हे विसरणारे रामद्रोहीच ठरतील, असं म्हणत शिवसेनेने अग्रलेखातून मोदींवर टीका केली आहे.
निकाल राम मंदिराच्या बाजूने दिला ते न्या. रंजन गोगोई विशेष निमंत्रितांत कुठेतरी दिसायलाच हवे होते, पण रंजन गोगोई नाहीत आणि बाबरीची घुमटे पायापासून उद्ध्वस्त करणारी शिवसेनाही नाही. राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचं श्रेय दुसऱ्या कुणाला मिळू नये यासाठी काय हा अट्टहास!, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.
भूमिपूजनाचा सोहळा राष्ट्राचा व तमाम हिंदूंचा आहे. पण तो आता व्यक्ती-केंद्रित आणि राजकीय पक्ष-केंद्रित झाला आहे. अर्थात जिथे श्रीराम हे कौटुंबिक राजकारण व अंतर्विरोधाचे बळी ठरले, तिथे इतर पामरांचे काय?, असा सवालही शिवसेनेनं उपस्थितीत केलाय.
महत्वाच्या घडामोडी-
बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार; अयोध्येतील सोहळ्याआधी ओवेसींचं ट्विट
आज बाळासाहेब हवे होते; राम मंदिर भूमिपूजनाआधी राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना
Tik-Tok अमेरिकेला विका, नाहीतर; डोनाल्ड ट्रम्प यांचा चिनी कंपनीला इशारा
सुशांतच्या आत्महत्येबाबत अमृता फडणवीसांचं आणखी एक ट्विट; म्हणाल्या…