आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आज अनंतचतुर्थी असून राज्यात ठिकठिकाणी गणरायाला निरोप दिला जात आहे. गणेश विसर्जनासाठी कोरोनाचे नियम लागू आहेत. पुण्यात मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे ढोल-ताशे पोलिसांनी बंद केले. वादकांजवळचे साहित्य काढून घेतले. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.
पुणे पोलिसांनी मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक थांबवून ढोल-ताशे जप्त केले आहेत. खंडणी सरकारच्या या दडपशाहीचा हिशेब चुकता केल्याशिवाय जनता रहाणार नाही, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, तुळशीबाग गणपतीच्या विसर्जनात ढोल-ताशे वाजवले जात असताना पोलिसांनी ढोल-ताशे जप्त केले. यानंतर तिथे थोडी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी सांगितले की, परवानगी नसतानाही ढोल-ताशे वाजवले जात होते.
पुणे पोलिसांनी मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक थांबवून ढोल-ताशे जप्त केले आहेत.
खंडणी सरकारच्या या दडपशाहीचा हिशोब चुकता केल्याशिवाय जनता रहाणार नाही. pic.twitter.com/xHCoBGj30q— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 19, 2021
महत्वाच्या घडामोडी –
पैठण – पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर भेग; पंकजा मुंडे लिहिणार नितीन गडकरींना पत्र
मोदींचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण मला अधिक आवडतो- प्रीतम मुंडे
किरीट सोमय्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“आधी पोलिसांशी बाचाबाची, तरीही किरीट सोमय्या निघाले कोल्हापूरला जाण्यासाठी”