मुंबई : मुंबई पोलिसांची पगार खाती अॅक्सिस बँकेमधून ‘एचडीएफसी’मध्ये हस्तांतरितकरण्याचा निर्णय झाला. यावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच ट्विटरवर वाकयुद्ध रंगलं आहे.
अॅक्सिस बँक ही माझी घरगुती बँक नाही, ही खाजगी क्षेत्रातील तिसर्या क्रमांकाची मोठी बँक आहे. मी त्यातील एक कर्मचारी असून त्याच बँकेसाठी 18 वर्ष काम केले आहे. संधीसाधू दलबदलूंना हा प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे समजतील? ही खाती 2005 आधारित तंत्रज्ञान आणि सेवांनुसार प्राप्त झाली होती.” असा टोला अमृता फडणवीसांनी प्रियांका चतुर्वेदींना लगावला.
दरम्यान, मुंबई पोलिस लवकरच अॅक्सिस बँकेतून 50 हजार पोलिसांची पगार खाती हस्तांतरित करतील. मनमानी करुन ज्या पद्धतीने बँकेची निवड करत राज्य सरकारी कर्मचार्यांाच्या पगाराची खाती रातोरात हलवण्यात आली होती, हे लक्षात घेता हा निर्णय आवश्यकच होता” असे ट्विट शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केलं होतं.
Axis Bank is not my family Bank-it’s third largest listed private sector bank and I’m an employee who has worked for the same bank for 18 years! How will an opportunistic दल बदलू understand this honesty & hard work! These accounts were acquired in 2005-basis technology & services https://t.co/bFDnvjiaEa
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 23, 2020
महत्वाच्या घडामोडी-
मुंबईतील सिटी सेंटर मॉलला भीषण आग; 10 तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु
खडसेंनी राष्ट्रवादीत जाऊन चूक केली, त्यांनी आरपीआयमध्ये यायला हवं होतं- रामदास आठवले
खडसेंनी माझा सर्वाधिक छळ केला, माझं नाव घ्याल तर…- अंजली दमानिया
महाराष्ट्र राज्य बंगालच्या दिशेने वाटचाल करीत आहे; निलेश राणेंची राज्य सरकारवर टीका