Home क्रीडा खेळपट्टी नव्हे तर सुमार फलंदाजीमुळे सामना 2 दिवसात संपला- विराट कोहली

खेळपट्टी नव्हे तर सुमार फलंदाजीमुळे सामना 2 दिवसात संपला- विराट कोहली

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेचा तिसरा सामना भारताने दुसऱ्याच दिवशी 10 विकेट्सने जिंकला आहे. पुर्नबांधणी करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) झालेल्या या सामन्यात विजय मिळवत भारताने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. यानंतर खेळपट्टीबाबत साशंकता निर्माण केली जात होती. यावर भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली.

खेळपट्टी नव्हे तर सुमार फलंदाजीमुळे तिसरा कसोटी सामना दोन दिवसांत निकाली ठरला, अशी प्रतिक्रिया विराट कोहलीनं व्यक्त करत मोटेराच्या खेळपट्टीची पाठराखण केली.

दरम्यान, पहिल्या डावात खेळपट्टी फलंदाजीसाठी पूर्णपणे योग्य होती. फक्त काही चेंडू अचानक उसळी घेत होते. माझ्या मते या सामन्यात दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली नाही. भारतीय संघ 3 बाद 100 अशा सुस्थितीत असतानाही 150 धावांच्या आत तंबूत परतला, असंही कोहलीने सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण”

संजय राठोड प्रकरणी तुमच्या प्रतिमेला साजेशी वाघासारखी भूमिका घ्या- आशिष शेलार

“दोन मिनिटाच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी बहुदा कानात सांगितलं असावं, मी तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाही”

भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सने दणदणीत विजय, मालिकेतही मिळवली आघाडी