‘राजगृह’वर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक

0
201

मुंबई : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर दोन अज्ञात व्यक्तींकडून 7 जुलैला तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.

तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास करुन एका आरोपीला अटक केली होती. या आरोपीचे नाव उमेश सीताराम जाधव असं आहे. उमेश हा हल्लेखोरांच्या सोबत होता. उमेशकडून माहिती घेऊन पोलीस प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध घेत होते.

दरम्यान, आज मुख्य आरोपी असलेल्या विशाल मोरेला अटक करण्यात आली. विशाल अशोक मोरे उर्फ विठ्ठल काण्या असे या आरोपीचे नाव आहे. तो 20 वर्षांचा आहे. विठ्ठल काण्या हा मजूर आहे. तो कल्याण स्टेशन येथे राहतो.

महत्वाच्या घडामोडी-

“…मग पंतप्रधानांचा 5 ऑगस्टचा कार्यक्रमही प्रतिकात्मक करा”

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींची मराठीतून शपथ; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याकडून कौतुक

राणे पिता पुत्रांवर शिवसेने केली सडकून टीका; दिली लाल तोंडाच्या माकडांची उपमा

मी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प नाही; माझ्या डोळ्यांसमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकत नाही- उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here