मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केरळ सरकारकडे मदतीची मागणी केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन केरळ सरकारने महाराष्ट्राला मोलाची मदत केली आहे. त्यांच्या या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आभार मानले.
महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर केरळ शासनाने 100 जणांची एक टीम महाराष्ट्रात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. 50 जणांची पहिली टीम मुंबईत पोहोचली आहे. केरळच्या डॉक्टर व परिचारिकांचे पहिले पथक सेव्हन हिल्स रुग्णालयात पोहोचल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री के. शैलजा यांनी दिली आहे.
दरम्यान, केरळच्या नर्सेस आणि डॉक्टर्सने प्राणपणाने लढत केरळला कोरोनापासून अगदी काही दिवसांत वाचवलं. त्यांचा हाच अनुभव महाराष्ट्र राज्याच्या देखील कामी यावा, असा मानस ठेऊन राज्य सरकारने केरळ शासनाला पत्र लिहिलं होतं.
महत्वाच्या घडामोडी-
ग्राहकांसाठी Jio ची खास ऑफर, दररोज मिळणार ‘इतका’ डेटा फ्री
ATKT असलेल्या विद्यार्थ्यांना नापास करणार का?; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा अनिवार्य
जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले, त्यांनी हा निर्णय घेणं हे काही नवल नाही- निलेश राणे