मुंबई : पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेतला. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केलं.
पदोन्नतीचा विषय मार्ग लावला आहे. आता पोलीस भरतीबाबत आम्ही काम करतोय. याबाबतही लवकरच निर्णय जाहीर करु, असं दिलीप वळसे-पाटील म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदींबद्दल मुंबईत झालेली पोस्टरबाजी, मोदींनी गुजरातला जाहीर केलेली मदत, मराठा आरक्षण, तौत्के चक्रीवादळात झालेलं नुकसान आदी विषयांवरही दिलीप वळसे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
पंतप्रधानाबद्दल झालेली पोस्टरबाजी हा पोलीस आयुक्तांच्या पातळीवरचा विषय, त्याबाबत मी वाच्यता करणे योग्य नाही, असं वळसे पाटील म्हणाले. ताैक्ते चक्रीवादळात गुजरातसह कोकणालाही मोठा फटका बसलाय. तसेच केंद्राने गुजरातला मदत केली याबद्दल तक्रार असण्याचे काही कारण नाही. मात्र, त्यासोबत महाराष्ट्रालाही मदत मिळायला हवी., असंही दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरेंचा कोकण दाैरा म्हणजे लिपस्टीक दाैरा; नितेश राणेंचा घणाघात
“कोकणाने शिवसेनेला आत्तापर्यंत खूप काही दिलं, आता शिवसेनेने कोकणाला देताना हात आखडता घेऊ नये”
“महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे व नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही”
मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींना 4 वेळा पत्र दिलं, अद्याप भेट नाही- खासदार संभाजीराजे