मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबई, कोकण आणि गुजरात किनारपट्टीला बसला. महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीवरून मुख्यमंत्र्यानी मातोश्रीच्या बाहेर पडून राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घ्यावा, अशी टीका विरोधक करत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या वादळग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी गुजरातला तातडीने 1 हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली. यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे व मोदींवर निशाणा साधला.
पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही., असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे व मोदींना टोला लगावला.
पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 20, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींना 4 वेळा पत्र दिलं, अद्याप भेट नाही- खासदार संभाजीराजे
“देवेंद्र फडणवीसांनी राज्यभर फिरण्यासाठी ई-पास काढलाय का?”
पंतप्रधान साहेब, खतांच्या किंमती कमी करा; डाॅ.प्रीतम मुंडेचं पंतप्रधान मोदींना पत्र
मोदी गुजरात दाैऱ्यावर तर फडणवीस कोकण दाैऱ्यावर, मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा- चित्रा वाघ