Home महाराष्ट्र मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींना 4 वेळा पत्र दिलं, अद्याप भेट नाही- खासदार...

मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींना 4 वेळा पत्र दिलं, अद्याप भेट नाही- खासदार संभाजीराजे

नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असं म्हणत भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

राज्यात भाजपने मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका घ्यावी. मी काही भाजपचा ठेका घेतलेला नाही. त्यांनी मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, त्यावर मार्ग काढावा. आंदोलन काय असतं, हे कोणीही मला शिकवू नये., असा आक्रमक पवित्रा संभाजीराजेंनी घेतला. ते आज नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, आक्रमक व्हायला 2 मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल संभाजीराजे यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी –

“देवेंद्र फडणवीसांनी राज्यभर फिरण्यासाठी ई-पास काढलाय का?”

पंतप्रधान साहेब, खतांच्या किंमती कमी करा; डाॅ.प्रीतम मुंडेचं पंतप्रधान मोदींना पत्र

मोदी गुजरात दाैऱ्यावर तर फडणवीस कोकण दाैऱ्यावर, मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा- चित्रा वाघ

महाराष्ट्रासाठी पुढचे 10 दिवस महत्त्वाचे- आरोग्यमंत्री राजेश टोपे