सिंधुदुर्ग : कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होतं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, असं वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केलं आहे.
महाविकासआघाडीने भाजपला दणका वगैरे दिलेला नाही. आकडेवारी समोर आल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. यावेळी भाजपने शिवसेनेची ताकद असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही मुसंडी मारली आहे. पुढच्या वेळेस कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही, असंही नारायण राणे म्हणाले.
दरम्यान, राणे यांचे वर्चस्व असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70 पैकी 47 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकल्याची माहिती समोर येत आहे. हा शिवसेनेच्या कोकणातील वर्चस्वाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
महत्वाच्या घडामोडी-
‘या’ ग्रामपंचायतीत रामदास आठवलेंच्या पॅनलचा मोठा विजय
“मंगळवेढ्यात राष्ट्रवादीला धक्का; 13 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा विजयी भगवा फडकला”
“राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही”
खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया