नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. हिंदुराष्ट्र मजबूत करण्यासाठी राज यांचा निर्धार असून त्यांनी कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी दिलेले अयोध्याला येण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे, यावरुन भूमिकेवरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मनसेवर निशाणा साधलाय.
शिवसेनेच हिंदुत्व आणि मनसे, भाजपचे हिंदुत्व यात जमीन-आसमानचा फरक आहे. हिंदुत्व आणि राम मंदिर हे शिवसेनेचं वेगळं नातं आहे असं म्हणत विनायक राऊत यांनी मनसेला टोला लगावला आहे. विनायक राऊत यांनी आज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ते बोलत होते.
हे ही वाचा : अजित दादांमुळं गप्प, अन्यथा किरीट सोमय्यांना…; साताऱ्यातील सभेत बोलताना शशिकांत शिंदे आक्रमक
दरम्यान, यावेळी त्यांनी केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनाही आव्हान दिले. आम्ही नारायण राणेंच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. त्यांची कुंडली आमच्याकडे आहे, असं विनायाक राऊत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“मुंडे भगिनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण”