ईडीकडून चौकशीची तारीख आली की एकनाथ खडसे यांना कोरोना होतो- गिरीश महाजन

0
174

जळगाव : ईडीकडून चौकशीची तारीख आली की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोना होतो, असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला. ते जळगावमध्ये टी.व्ही. 9 मराठीशी बोलत होते.

मागील काही दिवसांपासून खडसेंच्या मागे ईडीचे शुक्लकाष्ठ लागलेले आहे. तसेच आतापर्यंत खडसे यांना 3 वेळा कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आली आहेत. या दोन्ही गोष्टींचा संदर्भ घेऊन महाजन यांनी खडसेंना टोला लगावला. जेव्हा जेव्हा ईडीकडून चौकशीची तारीख येते, तेव्हा तेव्हा खडसे यांना कोरोनाची लागण होते, असं म्हणत महाजन यांनी खडसेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

संजय राऊत हे चंद्रावर, सुर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करु शकतात; चंद्रकांत पाटलांचा टोला

…पण लॉकडाउन नको; संजय निरुपम उद्धव ठाकरेंवर संतापले

‘ही’ निवडणूक जनतेला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात- गोपीचंद पडळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here