Home महाराष्ट्र मराठी पाट्यांचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या मनसैनिकांचं आहे- राज ठाकरे

मराठी पाट्यांचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या मनसैनिकांचं आहे- राज ठाकरे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्य मंत्रीमंडळाच्या पार पडलेल्या कालच्या बैठकीत एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला. महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात, असा निर्णय राज्य सरकारनं काल पार पडलेल्या बैठकीत घेतला.

दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांना मराठी पाट्या न लावण्याची सूट आता कायद्यातील पळवाट म्हणून वापरता येणार नाही. सरसकट सर्व दुकानांच्या पाट्या आता मराठी भाषेत असतील, असतील, अशी सुधारणा आता यासंदर्भातील कायद्यात केली जाणार असून या प्रस्तावाला काल राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : “विदर्भात मनसेला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यासह मनसेचे 40 पदाधिकारी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार”

दरम्यान, राज ठाकरे यांनी यासंदर्भात एक पत्रक काढलं असून राज्य सरकारला इशारा दिला आहे. महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरं तर आंदोलन करावं लागूच नये, परंतु 2008, 2009 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाचं श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये, त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच, असा मजकूर राज ठाकरे यांनी या पत्रकात लिहिला आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

संजय राऊतांना गोव्यात कोण ओळखतं; देवेंद्र फडणवीसांचा टोला

“कोरोनावर मात केल्यानंतर रोहित पवार पोहचले कर्जत नगर पंचायत निवडणूकीच्या मैदानात”

‘या’ कारणासाठी सांगलीत भाजप खासदार आणि शिवसेना आमदारात संघर्ष