आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAP पक्षाने पंजाबमध्ये बाजी मारली आहे.
पंजाबमधील एकूण 117 जागांसाठी निवडणूक लढवली जात असून आम आदमी पक्षाने एक्झिट पोलनुसार 88 जागांपेक्षा अधिक जागांवर आघाडीवर होता. यावरून आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : उत्तर प्रदेशातील प्रचंड विजयाचं श्रेय पंतप्रधान मोदी, कार्यकर्ते आणि जनतेला- योगी आदित्यनाथ
सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला आहे. पर्याय उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात., असं अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला आहे.
पर्याय उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात.— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 10, 2022
महत्वाच्या घडामोडी –
ही तर सुरुवात आहे, आम्ही लढत राहू; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
शिवसेना आणि राष्ट्रवादीची एकत्र मतं नोटापेक्षा कमी; देवेंद्र फडणवीसांची टीका
“पंजाबमध्ये AAP जिंकल्याचं नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना दुख:”