Home नागपूर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबलं जातंय; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबलं जातंय; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अरविंद बनसोडे यांनी आत्महत्या केल्याची घटना मागील महिन्यात घडली. यावर अरविंद बनसोडेचा मृत्यू संशयास्पद असताना पोलिसांकडून मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.

नागपूर येथील ‘वंचित’चे कार्यकर्ते अरविंद बनसोडेचा मृत्यू संशयास्पद असताना पोलिसांकडून मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आरोपी मिथिलेश उमरकरला वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबण्यात येतंय, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अरविंद बनसोडे हे नागपूर शहरातील थडीपवनी येथील गॅस एजन्सीच्या पायऱ्यांवर बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. यावेळी त्यांच्या बाजूला किटकनाशकाची बाटलीही आढळून आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्या केल्याची नोंद केली आहे. मात्र, ही आत्महत्या नसून अरविंद बनसोडे यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं सांगत पोलिसांना चौकशी करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

छत्रपतींच्या विचारांना आदर्श मानून त्यांनी दाखवलेल्या मार्गानं चालण्याचा निर्धार करुया- अजित पवार

राहुल गांधींवर इतकी टीका का करता?; स्वरा भास्करचा सवाल

विराट-रोहितमध्ये कोण भारी; ब्रॅड हॉग म्हणतो…

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…