मुंबई : ईडी, सीबीआय आणि इतर यंत्रणांचा वापर करून अनेक नेत्यांना भाजपात येण्यासाठी भाग पाडलं जात असंल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर टिकास्त्र सोडलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजप पक्ष वॉशिंग मशीनसारखा झाला आहे या पक्षातसुद्धा डाकूसुद्धा साधू होऊ शकतो, असं म्हणत भाजप नेते नारायण राणे हे कॉंग्रेसमध्ये असताना त्यांच्या परळ येथील एका इमारतीला ईडीने नोटीस दिल्याच्या बातम्या भाजपने पेरल्या होत्या. याशिवाय नारायण राणे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अहमदाबाद येथे भेटून आल्याचा व्हिडीओ राणे यांनी नकार दिल्यावर भाजपच्या लोकांनी व्हायरल केला होता. त्याचपध्दतीने बंगालमध्ये भाजपने लोक घेतले आहेत, असं नवाब मलिकांनी म्हटलं आहे.
दरम्यान, त्यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची आठवणही करून देताना नितीन गडकरीही वाल्या कोळयाचा वाल्मिकी करण्याची ताकद भाजपमध्ये असल्याचे बोलले होते, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“हालचाली तर वाढणारच”; शरद पवार-नरेंद्र मोदींच्या भेटीवर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
“महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही”
“मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवारांचा आशिर्वाद आहे”
“…म्हणून शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट”; जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण