Home पुणे “मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवारांचा आशिर्वाद आहे”

“मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवारांचा आशिर्वाद आहे”

पुणे : मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवारांचा आशिर्वाद आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना इशारा दिला.

पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरुन अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात वाद सुरु आहे. हा वाद एवढा टोकाला गेलाय की, मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद आहे, असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी यावेळी केलं.

दरम्यान, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. याचं उद्घाटन आज अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्याचं नियोजन होतं. मात्र कालच शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हे उद्घाटन उरकून टाकलं. हा रस्ता आपण मंजूर केला असून, आपणच याचं भूमीपूजन केलं होतं. त्यामुळे आढळरावांनी रस्त्याचे उद्‌घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

महत्वाच्या घडामोडी –

“…म्हणून शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट”; जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

“पंतप्रधान मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून योगी सरकारचं यूपीमधलं अपयश लपत नाही”

…त्यामुळे विरोधकांनी शरद पवारांना बळीचा बकरा बनवू नये- रामदास आठवले

“मुंबईत झोपड्या जमीनदोस्त करण्यास सुरूवात; अतुल भातखळकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”