Home महाराष्ट्र “ठाकरे सरकारची अवस्था ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नही’ अशी...

“ठाकरे सरकारची अवस्था ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नही’ अशी झालीये”

मुंबई : राज्यातील वाढती करोना रुग्णसंख्या आणि संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. सरकारच्या या निर्णयावरुन भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

रोज बदलणारे नियम, मंत्र्यांची परस्पर विरोधी विधानं पाहता ठाकरे सरकारची परिस्थिती ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नही’ अशी झाली आहे,” अशी टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केशव उपाध्ये बोलत होते.

“गोरगरीब, कष्टकरी वर्गाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारनं या वर्गाला आर्थिक मदत द्यावी असं भाजपाने सुचवलं होतं. मात्र, रविवारी आपला निर्णय जाहीर करून मुख्यमंत्री ‘मातोश्री’त बसले आहेत. या संकट काळात जनतेचं काय हा साधा प्रश्नही त्यांना पडत नसावा काय? सरकार एवढे निर्दयी कसे असू शकते?,” असा सवालही केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी –

“अनिल देशमुख आणि येडियुरप्पा यांना वेगळा न्याय का? “

एकीकडे पवार माझे बाप म्हणायचं आणि दुसरीकडे…; रुपाली चाकणकरांची चित्रा वाघ यांच्यावर टीका

जिल्हा परिषद शाळेमधल्या हा मुलाने केलेला डान्स होतोय व्हायरल; पहा व्हिडिओ

लॅाकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा जनतेतून उद्रेक होईल- उदयनराजे भोसले