मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने कोरोना लसीकरणासाठी वयोमर्यादेची अट शिथील करून राज्यातील 18 वर्षावरील सर्वांना कोरोना लस देण्याची मागणी केली होती. पण केंद्र सरकरने ही मागणी अमान्य केली आहे. यावरुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी नाकारून केंद्र सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारच्या आडमुठ्या आणि लस सार्वत्रिकरणास अडवणूकीच्या धोरणामुळे देशातील केवळ तीन राज्येच लोकसंख्येच्या फक्त 5% लसीकरणापर्यंत पोहचली आहेत, हा अतिशय गंभीर आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने घातक प्रकार आहे, असं नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, केंद्राने लसींचा योग्य पुरवठा न केल्यास केंद्र सरकार व भाजपाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही नाना पटोले यांनी यावेळी दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“ठाकरे सरकारची अवस्था ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नही’ अशी झालीये”
“अनिल देशमुख आणि येडियुरप्पा यांना वेगळा न्याय का? “
एकीकडे पवार माझे बाप म्हणायचं आणि दुसरीकडे…; रुपाली चाकणकरांची चित्रा वाघ यांच्यावर टीका
जिल्हा परिषद शाळेमधल्या हा मुलाने केलेला डान्स होतोय व्हायरल; पहा व्हिडिओ