मुंबई : राज्याला बुधवारी निसर्ग चक्रीवादळानं तडाखा दिला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग मार्गे हे चक्रीवादळ पुढे सरकले. या वादळामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं असून, सुदैवानं कुठेही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं.
कितीही संकटं आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी. महाराष्ट्रा, काळजी घे, असं ट्विट मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅंडल वरून करण्यात आलं आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच या वादळाचा प्रवास महाराष्ट्राच्या दिशेनं सुरू झाला. दुपारी दीड वाजता निसर्ग चक्रीवादळानं जमिनीला स्पर्श केला. ताशी 120 किमी वेगानं आलेल्या या वादळामुळे कोकण किनारपट्टीला तडाखा दिला. अनेक ठिकाणी घराची पडझड झाली, तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्यानं वीज पुरवठा खंडित झाला.
कितीही संकटं आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी!#महाराष्ट्र #निसर्ग pic.twitter.com/RsWFHrH2n0
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) June 3, 2020
महत्वाच्या घडामोडी-
आम्ही तुमच्या पाठिशी आहोत; अरविंद केजरीवालांचं उद्धव ठाकरेंना टि्वट
अर्शद वारसीने केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक; म्हणाला…
वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका; अजित पवार यांचं जनतेला आवाहन
निसर्ग’ चक्रीवादळामुळे नेमकं काय नुकसान होऊ शकतं?