नागपूर : राज्यसभेत नुकत्याच घडलेल्या धक्काबुक्कीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे विरोधकांकडून संसदेत घालण्यात येणाऱ्या गोंधळाविषयी उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
राहुल गांधी यांना एका वर्षासाठी संसदेतून निलंबित करा, अशी मागणी रामदास आठवले यांनी यावेळी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही मागणी केली.
राज्यसभेत घडलेला प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. अधिवेशनादरम्यान सरकारने सभागृहात अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी सातत्याने गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. राहुल गांधीही चुकीच्या पद्धतीने वागले आहेत. यासाठी त्यांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबित केले पाहिजे, असं मत रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं.
महत्वाच्या घडामोडी –
“…तरी भाजपच सर्वाधिक जागांवर निवडून येईल”- देवेंद्र फडणवीस
“शरद पवारांनी आधी आत्मपरीक्षण करावं, मग सरकारकडे बोट दाखवावं”
“…हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेहऱ्याला असलेला डाग”
हिंदुत्व ही बाळासाहेबांसाठी ‘साधना’, तर उद्धव ठाकरेंसाठी…; गोपीचंद पडळकरांची टीका