Home देश “शरद पवारांनी आधी आत्मपरीक्षण करावं, मग सरकारकडे बोट दाखवावं”

“शरद पवारांनी आधी आत्मपरीक्षण करावं, मग सरकारकडे बोट दाखवावं”

नवी दिल्ली : बुधवारी राज्यसभेमध्ये गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. बाहेरून आलेल्या मार्शल्सने विरोधी पक्षांच्या खासदारांना मारहाण केली, असा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. यावरुन राज्यसभेचे नवनियुक्त नेते केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय.

विरोधी सदस्य राज्यसभेत टेबलवर चढून गोंधळ घालत होते. महिला खासदारांशी त्यांनी गैरवर्तन केले. आता त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याच्या भीतीने ते सरकारकडे बोट दाखवत आहेत, असा आरोप पीयूष गोयल यांनी केला.

दरम्यान, सरकारकडे बोट दाखवण्यापूर्वी विरोधी खासदारांमध्ये ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवार यांनी आधी आत्मपरीक्षण करावे आणि मग विरोधकांनी सरकारकडे बोट दाखवावे, असं पियूष गोयल यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी –

“…हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेहऱ्याला असलेला डाग”

हिंदुत्व ही बाळासाहेबांसाठी ‘साधना’, तर उद्धव ठाकरेंसाठी…; गोपीचंद पडळकरांची टीका

“संजय राठोडांच्या विरोधात आणखी एका महिलेची पोलिसात तक्रार; चित्रा वाघ यांनी दिली माहिती

चंद्रकांत पाटील यांना आता मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही- अशोक चव्हाण