Home क्रीडा “सुर्यकुमार चमकला! रंगतदार झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 5 विकेट्सने केला पराभव”

“सुर्यकुमार चमकला! रंगतदार झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 5 विकेट्सने केला पराभव”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जयपूर : भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 5 विकेट्सने पराभव केला.

हे ही वाचा : “ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मुस्लिम भागात जनजागृती करण्यासाठी घेणार सलमान खानची मदत”

भारताचा कर्णधार रोहित शर्माने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकात 6 विकेट गमावत 166 धावा केल्या. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गप्टीलने सर्वाधिक 42 चेंडूत 70 धावांची विस्फोटक खेळी केली. तर मार्क चॅपमननं 50 चेंडूत 63 धावांची खेळी केली. भारताकडून रविचंद्रन अश्विन व भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर दीपक चहर व मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली.

दरम्यान, धावांचा पाठलाग करताना भारताने हे लक्ष्य शेवटच्या षटकात 2 चेंडू राखत पार केलं. भारताकडून सुर्यकमार यादवने सर्वाधिक 40 चेंडूत 62 धावांची खेळी केली. तर कर्णधार रोहित शर्माने 36 चेंडूत 48 धावा केल्या. न्यूझीलंकडून ट्रेंट बोल्टने 2, तर टीम साऊथी, मिचेल सँटनर, डॅरेल मिचेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपने विरोधी पक्ष म्हणून काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं स्वागत; जयंत पाटलांचा टोला

राज्यात प्रत्येकजण मुख्यमंत्री, मोदी सरकारमध्ये मात्र कुणालाच मंत्री आहोत असं वाटत नाही; राऊतांचा फडणवीसांना टोला

…तर अख्खा हिंदुस्थान पेटल्याशिवाय राहणार नाही; भाजपच्या ‘या’ नेत्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा