मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पित्ताशयावर आज यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे.
शरद पवार यांना 30 मार्चला पोटात दुखत असल्यामुळे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर 7 दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता. त्यानंतर 15 दिवसांनी आज त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे शरद पवारांना रविवारी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान, आज त्यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची तब्येत स्थिर असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
सरकार पाडतील तेंव्हा फडणवीसांचं अभिनंदन करू; संजय राऊतांचा टोला
मोठी बातमी! दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती
सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, मी बघतो- देवेंद्र फडणवीस
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट; रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का?