“शिवसेनेची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

0
864

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता शिवसेनेनं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

काँग्रेसचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष संजय पाटील यांनी आज पक्षाला धक्का देत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय पाटील यांनी शिवबंधन हाती बांधलं.

हे ही वाचा : शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण!

दरम्यान, संजय पाटील हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षावर नाराज होते. काही दिवसांपूर्वीच पाटील यांनी आपला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र प्रदेशाध्यक्ष यांनी तो राजीनामा न स्वीकारता वेट अँड वॉचचा सल्ला दिला होता. मात्र आज अखेर पाटील यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण!

मोठी बातमी! राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची गुणवत्ता यादी जाहीर; प्रमोद चौगुले, रुपाली माने राज्यत प्रथम

काँग्रेसच्या ‘या’ आमदाराला झालेली अटक बेकायदेशीर; महाराष्ट्र काँग्रेस पर्यावरण विभाग उपाध्यक्ष धनंजय पाटील यांचा भाजपवर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here