Home पुणे पुण्याच्या नवले ब्रिजजवळ विचित्र अपघात; 15 गाड्या एकमेकांवर धडकून 3-4 जणांचा जागीच...

पुण्याच्या नवले ब्रिजजवळ विचित्र अपघात; 15 गाड्या एकमेकांवर धडकून 3-4 जणांचा जागीच मृत्यू

पुणे : कोरोनाच्या काळात अनेक धक्कादायक व विचित्र अपघात झाल्याचं आपण पाहिलं आहे. असाच एक विचित्र अपघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर झाला आहे.

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुण्याच्या नवले पुलाजवळ तब्बल 15 गाड्यांचा एकत्र अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 3 ते 4 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. भर दिवसा असा विचित्र अपघात झाल्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं आहे. थोडा वेळ वाहतूक कोंडीदेखील झाली होती. मात्र हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती कळली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडताच स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना आणि बचाव कार्यासाठी अधिकाऱ्यांना पाचाराण केलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाती वाहन चालकांची चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, तसेच पोलिसांनी रस्त्यामधील वाहनं बाजूला करण्याचं काम सुरू केलं असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी 3-4 जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

खोदा पहाड, निकला चुहां; सुशांतसिंह प्रकरणावरून गुलाबराव पाटलांचा भाजपला टोला

अग्गंबाई सासूबाई मालिकेतील अभिनेत्री निवेदिता सराफ (बबड्याची आई) यांची कोरोनावर मात

सांगलीत अतिक्रमण हटविताणा महानगरपालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की

“दिल्ली कॅपिटल्सचा राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरवर दणदणीत विजय”