आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून बँकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान 18 डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्याबाबत आमदार नितेश राणे यांचे कट्टर समर्थक संदेश सावंत यांना पोलीस अटक केली असून नितेश राणे यांची चौकशी सुरु आहे. यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दडपशाही चालविली आहे. या दडपशाहीला खतपाणी घालण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. भाजप कार्यकर्त्यांवर अटक मोहीम चालवली जात आहे. मात्र हे अटकसत्र त्यांनी थांबवले नाही, तर एसपी कार्यालयावर आम्ही मोर्चा काढू, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
हे ही वाचा : भाजपावाले सत्तेसाठी वेडे झाले आहेत; ‘या’ मुख्यमंत्र्यांची टीका
राज्यातील महाविकास आघाडी सर्व बाबतीत निष्क्रिय ठरली असून कोणतेही प्रश्न सोडण्यात अपयशी ठरली आहे. मुख्यमंत्री असून नसल्यासारखे आहेत, अशी टिकाही नारायण राणे यांनी यावेळी केली आहे.
कणकवलीमध्ये एका कार्यकर्त्याला मारहाण झाली, या घटनेबाबत आमदार नितेश राणे, संदेश सावंत यांना पोलीस वारंवार बोलावून सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोपही यावेळी नारायण राणे यांनी केला आहे.
दरम्यान, जिल्हा बँक निवडणूक व चार नगरपंचायतीसाठी होणाऱ्या निवडणूक पार्श्वभूमीवर नारायण राण बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“ज्यांच्या पक्षाची अर्थव्यस्था डबघाईला आली, ते देशाची अर्थव्यस्था कशी मजबूत करतील?”
कोंबड्यांना मांजर केल्यानं कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का?; अजित पवारांचा नितेश राणेंना टोला
…अन् चक्क भाजप खासदार नवनीत राणा महिलांसोबत धावू लागल्या; पहा व्हिडिओ