Home देश भाजपावाले सत्तेसाठी वेडे झाले आहेत; ‘या’ मुख्यमंत्र्यांची टीका

भाजपावाले सत्तेसाठी वेडे झाले आहेत; ‘या’ मुख्यमंत्र्यांची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीत भाजपाचे नेते व आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणे  यांनी त्यांचे वडील व ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची घोषणा केली. यावरुन आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

‘भाजपावाले सत्तेसाठी वेडे झालेत!’ असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी विश्वजित राणेंवर टीका केली. केजरीवाल यांनी याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

हे ही वाचा : “कट्टर शिवसैनिक सुमंत रूईकरच्या कुटूंबाची जबाबदारी आता शिवसेनेची, त्यांना काहीही कमी पडू देणार नाही”

“विश्वजित राणे यांनी वडिलांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना पराभूत करण्याचा निर्धार केला आहे. गोव्यात हे काय घडत आहे? सत्तेसाठी लोक पित्याला विसरू लागले आहेत. आपण भगवान रामाला मानणारे हिंदू आहोत, असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी व्हिडीओमध्ये रामायण मालिकेतील दृश्यांचा वापर करत रामाने पित्यासाठी सिंहासनाचा त्याग केला आणि वनवासात गेला. इथे भाजपाचे विश्वजित राणे स्वत:ला हिंदू म्हणतात आणि वडिलांना पराभूत करण्याच्या गोष्टी करतात, अशी टिका विश्वजित राणे यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

अजित पवार म्हणाले, संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते; आता नारायण राणे म्हणतात…

“उद्धवसाहेब, नवऱ्याने उभं आयुष्य शिवसेनेसाठी दिलं, त्यांच्या माघारी आम्हाला मदतीची गरज”

राणेंच्या अडचणीत वाढ; शिवसैनिकावर हल्ल्याप्रकरणी राणेंच्या कट्टर समर्थकाला अटक