शिवसेना-राष्ट्रावादीमध्ये ठिणगी; प्रभाग रचनेवरून राष्ट्रवादीचे शिवसेनेवर गंभीर आरोप

0
376

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका तोंडावर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग रचनेवरून शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना हवे तसे प्रभाग तयार करते, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. या आरोपांमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : अबब! 20 वर्षांची तरुणी पडली 77वर्षीय आजोबांच्या प्रेमात; खोटं बोलून करणार होती लग्न, पण…

निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे प्रभाग रचना करावी आणि त्यांनी नकाशाही जारी करावा. इथून कच्चा माल पाठवायचा आणि मग खात्री करायची, असे होत नाही. तुम्ही काही पक्का वगैरे नाही. तुम्हाला योग्य वाटेल तसे छापा आणि प्रकाशित करायचा. हे आम्ही गेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत पाहिले आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. जितेंद्र आव्हाड मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान, तेव्हा आम्ही आणि शिवसेना एकत्र नव्हतो, पण शिवसेना हवी तसे वॉर्ड ठाणे महानगरपालिका निवडणूकीत पाडून घेते, हे आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“….म्हणून मतदानाच्या आधीच काँग्रेसने बदलला उमेदवार”

“दुनिया मे *** की कमी नही, जरा योगीजी को सुनिये; संजय राऊतांनी व्हिडिओ केला ट्विट

आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवा; ‘या’ काँग्रेस नेत्याचं कार्यकर्त्यांना आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here