Home तंत्रज्ञान सोनी कंपनीने केला ‘हा’ नवा कॅमेरा लाॅँच

सोनी कंपनीने केला ‘हा’ नवा कॅमेरा लाॅँच

291

मुंबई : सोनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फुल फ्रेम इंटरचेंजेबल लेन्स कॅमेरा Alpha 9 II भारतात लाँच केला आहे. या कॅमेराची किंमत तब्बल 3 लाख 99 हजार 990 रुपये इतकी आहे. लाँच केल्यानंतर देशातील सर्व सोनी सेंटरमध्ये हा कॅमेरा उपलब्ध राहील, असं कंपनीने लाँचिंगवेळी सांगितलं आहे.

Alpha 9 II हा कॅमेरा ओरिजनल Alpha-9 च्या फीचर्सवर आधारीत आहे. ज्यामध्ये ऑटो फोकस आणि ऑटो एक्सपोजर ट्रॅकिंग आहे. त्यासोबतच अप्रतिम असा ग्राऊंड ब्रेकिंग स्पीड आहे. या कॅमेरामध्ये एका सेकंदात 20 फोटो काढता येऊ शकतात, अशी माहिती कंपनीने दिली आहे .

नवीन Alpha 9 II मध्ये अ‌ॅडव्हान्स फोकस सिस्टम आहे. ज्यामध्ये 693 फोकल-प्लेन फेज-डिटेक्शन एएफ पॉइंटचा समावेश आहे. हा कॅमेरा 93 टक्के फोटोचे क्षेत्र कव्हर करु शकतो. तसेच यामध्ये 425 कॉन्ट्रास्ट एएफ पॉइंटचाही समावेश आहे.

दरम्यान, हा कॅमेरा मॅकेनिकल शटरसह 10 एफपीएससह सलग शूट करु शकतो. या नव्या कॅमेराचा स्पीड Alpha-9 पेक्षाही दुप्पट आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मारुती सुझुकीने कंपनीने परत मागवल्या तब्बल 63,493 गाड्या

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 6 गडी राखून विजय

कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण स्वागतार्ह वाटतो- राज ठाकरे

“महाराष्ट्राच्या पोलिसांनी पण ह्यातून काही शिकलं पाहिजे”