दापोलीतील साई रिसाॅर्टप्रकरणी किरीट सोमय्यांनी दिली चुकीची माहिती; अधिकाऱ्याने केला खुलासा

0
1065

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरी : भाजप नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या दापोली येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी सातत्याने आरोप करत आहेत. हा रिसॉर्ट चुकीच्या पद्धतीने बांधली असल्याचा आरोप सोमय्या सातत्याने करत आहेत.

अशातच सोमय्यांनी, या रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडले जात असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी प्रशासनाने पाणी थेट समुद्रात जात नसल्याचा याबाबत अहवाल देऊनही सोमय्या आरोप करत होते. यावर आता पर्यावरण विभागाने याचा खुलासा केला आहे.

हे ही वाचा : “काहीही झालं तरी अखेरपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार; वाढदिनी ‘या’ मोठ्या नेत्याचा शब्द”

दरम्यान, काल या ठिकाणी महसूल, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पाहणी करून गेले असून, या रिसॉर्टचे पाणी समुद्रात सोडण्यात आले नसल्याचे पाहणीत दिसून आले आहे. तसेच हॉटेल पासून काही अंतरावर सांडपाणी विल्हेवाट लावण्यासाठी टाकी आढळून आली आहे. मात्र समुद्रापासून काही अंतरावर बांधण्यात आली असल्याने त्या टाकीला कोणतीही पाईप जोडून समुद्रात थेट पाणी सोडण्यात आले नसल्याचे या अधिकाऱ्यांना दिसून आल्याने सोमय्यांचा हा दावा चुकीचा असल्याचं समोर आलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! मुंबईत ‘या’ दिवसापासून तब्बल 13 दिवस संचारबंदी; वाचा काय सूरू, काय बंद”

“अखेर जत तालुक्याला न्याय मिळणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली ‘ही’ मोठा घोषणा”

महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा येणार?; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here