मुंबई : मराठी ही महाराष्ट्राची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकत आहात, ते टेकू शकला असता? बसू शकत आहात, ते बसू शकला असतात? असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
विधीमंडळातील वि.स पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि मराठी भाषा विभाग, मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यात ते बोलत होते.
दरम्यान, वर्षामागून वर्ष जात आहेत. अजून मराठी भाषेला अभिजात भाषेची मान्यता मिळत नाहीये. गेल्या वर्षी मी उद्वेगाने म्हटलं, जे दिल्लीत दर्जा देणारे किंवा नाकारणारे बसले आहेत, त्यांच्या लक्षात एक गोष्ट आणून द्यायला हवी किंवा अगदी खडसावून सांगितलं पाहिजे, ही आमची मातृभाषा आहे आणि आम्हाला तिचा अभिमान आहेच, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची धमक नाही, पण…”
अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही; पूजाच्या आईचा ‘मोठा’ खुलासा
मुख्यमंत्री साहेब, नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचं मन हेलावून टाकणारं पत्र
“भारताचा स्टार गोलंदाज आर विनय कुमारची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती”