“…तर 48 खासदार असलेला शिवरायांचा मावळा पंतप्रधान का होऊ शकत नाही?”

0
471

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात अनेक दिग्गजांनी हजेरी लावत पवारांना शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे देखील उपस्थित होते. त्यांनीही शरद पवारांना अनोख्या शुभेच्छा दिल्या.

हे ही वाचा : “कोरोना काळात शिवसेनेच्या अनेक शाखा बंद होत्या, मात्र भाजपचा कार्यकर्ता रस्त्यावर मदत करत होता”

या देशाला शरद पवारांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तसेच जर 26 खासदार असलेला गुजरात मधील व्यक्ति पंतप्रधान पदी बसू शकते, तर मग 48 खासदार असलेला महाराष्ट्रातला महाराजांचा मावळा हा त्या सर्वोच्च स्थानी विराजमान का होणार नाही, हा विचार आम्ही प्रत्येकांनी करणं गरजेचं आहे आणि ज्या दिवशी हे स्वप्न पूर्ण होईल त्या दिवशी खात्रीने सांगतो की, संसदेतल्या प्रांगणातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या मराठी मातीतल्या सुपुत्राला त्या स्थानी बसल्यानंतर हसताना बसेल, असं अमोल कोल्हे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“अहमदनगरमध्ये शिवसेनेचा भाजपला दे धक्का; सरपंच, उपसरपंचासह अनेकांनी हाती बांधलं शिवबंधन”

शिवसेनेनं स्वतःचं घर किती गळकं आहे ते पाहावं; मनसेचं शिवसेनेला प्रत्युत्तर

शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार झाले भावूक; म्हणाले,पवारसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here