आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
चंद्रपूर : केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदे यांना दिले आहे. यानंतर उध्दव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना, आता उद्धव ठाकरे गटाचे नेते यांनी शरद कोळी खळबळजनक विधान केले आहे. शरद कोळी यांनी केलेल्या विधानावरुन नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणावर राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निर्णय लागला नाही तर रस्त्यावर रक्तपात होईल, असे धक्कादायक विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शरद कोळी यांनी चंद्रपुरात केले आहे.
आमचा आणि जनतेचा कायद्यावरील विश्वास उडाला आहे. कायदा मोदी-शाह, शिंदे-फडणवीस यांनी विकत घेतला आहे. सत्तेवर बसलेली माकडं आहेत आणि ती विकली गेली आहेत असे सांगत न्याय मिळाला नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, असं शरद कोळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
“लावणी कलाकार गाैतमी पाटीलच्या चेजिंग रूममध्ये चोरून चित्रीकरण, राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल”
नामांतरास विरोध करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांच्यावर मनसेचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले…
“पक्षाची चोरी झाली, चिन्हाची आणि नावाचीही चोरी झाली तरीही महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या मागे”