पुणे : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला तपास सीबीआयकडे जाताच भाजपने आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर सडकून टीका केली. याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलंय.
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर चिखलफेक करनाऱ्यांना मी आठवण करून देते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याच्या बातमी महाराष्ट्राने पाहिली आहे, असं रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुन्ना यादव सारख्या गुंडांला महामंडळ देणाऱ्या, तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये राज्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे. म्हणून माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या टोळीने तरी राज्याचा कारभार कसा करावा हे महाविकास आघाडी सरकारला शिकवू नये, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर चिखलफेक करनाऱ्यांना मी आठवण करून देते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याच्या बातमी महाराष्ट्राने पाहिली आहे.(1/2)@CMOMaharashtra @MHVaghadi @AnilDeshmukhNCP @Dev_Fadnavis
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 20, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“जानेवारी ते डिसेंबर शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत केंद्राशी विचारविनिमय”
राजू शेट्टी सरड्यासारखे रंग बदलतात; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना टोला
“सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास डॉ. दाभोलकर हत्या चौकशीप्रमाणे होऊ नये”
न्यायालय आणि कायद्याचा आदर करण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर; त्यामुळे…